महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर इथल्या सभेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. या सभेत त्यांनी १० वचनांची घोषणा केली. यात लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना एकविसशे रुपये, २५ लाख रोजगार निर्मिती तसंच अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपये वेतन, वीज बिलात ३० टक्के कपात अशा वचनांचा समावेश आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.