स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचे या वर्षीचे अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. समाजसेवेचं काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना अण्णा हजारे यांच्या संस्थेकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार अहिल्यानगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे, गेवराईच्या आई संस्थेचे अध्यक्ष संतोष गर्जे, कोल्हापूरच्या सावली केअर सेंटरचे अध्यक्ष किशोर देशपांडे आणि शेवगावच्या उचल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खेडकर यांना १५ जून रोजी राळेगणसिद्धी इथं प्रदान करण्यात येणार आहेत.
Site Admin | January 13, 2025 8:28 PM | Anna Hazare Award
स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचे अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर
