लातूर इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जिल्ह्यातील ५१ शाळांमधील जवळपास ६०० दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिव्यांगत्व प्रकार आणि वयोगटानुसार ९२ विविध गटात या स्पर्धा होणार असल्याचं, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी सांगितलं. उद्घाटनापूर्वी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं, त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.
दरम्यान, लातूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं काल जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या महोत्सवात विविध कलाप्रकारात अनेक युवक सहभागी झाले आहेत.
Site Admin | December 7, 2024 10:26 AM | disabled students | sports competition | लातूर