मुंबई खुल्या टेनिस २०२५ स्पर्धेतल्या महिला एकेरीच्या ३२ व्या फेरीत अंकिता रैना हिनं वैष्णवी आडकर हिचा ६-२,६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईत क्रिकेट कल्ब ऑफ इंडिया इथं हा सामना खेळण्यात आला. उपांत्यपूर्व फेरीत अंकिताची लढत कॅनडाच्या रेबेका मारिनो हिच्याशी होणार आहे.