डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे – देवेंद्र फडणवीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्या आधारे नागपुरात सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला, असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाजे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नोंदवलेलं निरीक्षण ध्यानात न घेताच आरोप केला आहे अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे. आपल्या विरोधातल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सचिन वाजेसारख्या अपराधी व्यक्तीची मदत फडणवीस यांना का घ्यावी लागते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा