ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि दूरदर्शनच्या सह्याद्री या मराठी वाहिनीवरील वृत्त निवेदक अनंत भावे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखन, कथासंग्रहाबरोबरच त्यांनी विपुल प्रमाणावर बालसाहित्याचं लेखन केलं. अग्गड हत्ती तग्गड बंब, अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. २०१३ मध्ये बालसाहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Site Admin | February 24, 2025 1:44 PM | Anant Bhave
ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन
