महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यानं देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला आता उर्वरित १२० एकराचा भूखंड मिळणार आहे. या भूखंडावर आणि त्यासोबत मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील सुमारे १७५ एकर मिळून जवळपास ३०० एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित केलं जाणार आहे.