डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट

दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत..
‘‘वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे, हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसांत हे हेल्मेट दुचाकीच्या डिक्कीमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे. नागपूरचे डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी फोल्डिंग हेल्मेट तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे हेल्मेट तयार करताना, त्याची सर्व कार्यपद्धती आणि मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेल्या या फोल्डिंग हेल्मेट साठी डॉ. संजय ढोबळे आणि आदिती देशमुख या दोघांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालं आहे.’’

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा