चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्याची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते १० नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या कॉर्पोरेट कर संकलनात चार लाख ७९ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत पाच लाख १० हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे.
Site Admin | November 12, 2024 2:34 PM | country | tax collection