शिक्षण मंत्रालयानं शालेय शिक्षणातल्या विविध भाषांचा वापर त्याचप्रमाणे लहान मुलांना स्थानिक भाषेमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणासदर्भात काल नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. शालेय शिक्षण विभागाचे सचिव संयज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला ज्येष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ञ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक भाषेचं ज्ञान असणं व्यक्तीमत्त्व विकासासाठी आणि परस्पर संवादासाठी आवश्यक असून विद्यार्थी कोणतेही शिक्षण आपल्या मातृभाषेतून लवकर शिकू शकतात असं मंत्रालयानं यावेळी म्हटलं आहे.