डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 11, 2024 7:05 PM

printer

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीची आज यशस्वी चाचणी झाली. या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाचं सी २९५ विमान यशस्वीरित्या उतरलं. त्यावेळी सिडको अग्निशमन दलाकडून विमानावर पाण्याचा फवारा उडवत सलामी देण्यात आली. त्यानंतर सुखोई ३० या फायटर विमानानंही धावपट्टीला समांतर उड्डाण केलं. 

 

विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एखनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी केली जाणार आहे. या विमानतळावरून दरवर्षी ९ कोटी प्रवासी तर २६ लाख टन माल वाहतूक केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबई विमानतळ ठाणे शहराशी तसंच मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.  

 

आधुनिक भारताचा विकास दाखवणारं हे उड्डाण असून यामुळे केवळ नवी मुंबईच नव्हे तर मुंबई आणि राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा