बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५३ व्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. गुजरात, पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झाली असून टप्प्याटप्प्याने देशभरात अंमलबजावणी होईल, असं त्या म्हणाल्या. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट, प्रतीक्षा कक्ष यासारख्या सुविधांना जीएसटीतून वगळल्याचंही त्या म्हणाल्या.
Site Admin | June 22, 2024 8:09 PM | जीएसटी | टॅक्स क्रेडिट