भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेमध्ये महाराष्ट्रातील एकंदर 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातीलमहत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईसाठी लवकरच 238 नव्या वातानुकूलित उपनगरीय रेल्वेगाड्या आणण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध इतिहास, तसंच राज्यातल्या इतर सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणारी भारत गौरव रेल्वेगाडी येत्या 16 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.