राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान आज सर्वसामान्यांसाठी खुलं झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या बुधवारी अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक 2024 चं उद्घाटन केलं. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी हे उद्यान खुलं राहणार आहे. येत्या 29 तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमृत उद्यानात नामवंत खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे.
याशिवाय, शाळा आणि विद्यापीठातील शिक्षकांना या उद्यानाचं वैभव पहायला मिळणार आहे. स्वदेशी तसंच परदेशी फुलांच्या विविध प्रजाती या उद्यानाचं मुख्य आकर्षण आहे. पर्यटकांसाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानकापासून मोफत बस सेवा देखील उपलब्ध असेल. तसंच प्रवेशही विनामूल्य असेल.