भारतात आलेल्या, सध्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या.
या संदर्भात त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. काल नवी दिल्ली इथून 191 पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली आहे. त्यांनी तात्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील, दिरंगाई झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.