पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा संदेश दिला. सिंधू जल कराराच्या संदर्भात अमित शहा संध्याकाळी बैठक घेणार आहेत. त्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.