केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा म्हणजे ११ आणि १२ एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. परवा सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील.
त्यानंतर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि रायगडावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच दिवशी संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.