भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत घाटकोपरमधे प्रचारसभा घेतली. मुस्लिम धार्मिक नेत्यांनी १० टक्के आरक्षण मागितलं आहे. मात्र हे आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना केला.
राम मंदिर बांधण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं, ते पूर्ण केलं. काशी विश्वनाथ कॉरिडॉरही तयार केला. वक्फमधे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कोणतीही जमीन अशीच वक्फची होऊ शकत नाही, असं ते म्हणाले.