केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमतानं फेरनिवड झाली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राजभाषा संसदीय समितीची पुनर्रचना करण्यासाठी काल नवी दिल्लीत समितीची बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली. सर्व सरकारी यंत्रणांमध्ये 2047 पर्यंत भारतीय भाषांचा वापर केला जाण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं शहा यांनी या निवडीनंतर सांगितलं. अमित शहा यांनी 2019 ते 2024 या कालावधीत समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. राजभाषा विभाग एक सॉफ्टवेअर विकसित करत असून, त्याआधारे आठव्या सूचीतील सर्व भाषा स्वयंचलितपणे अनुवादित केल्या जातील, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं.