केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या दोन प्रचारसभा आज राज्यात झाल्या. केंद्रात पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार २००४ ते २०१४ या कालावधीत दहा वर्षे सत्तेत असतानाच्या काळात महाराष्ट्राला केवळ १ लाख ९१ हजार कोटी रूपये निधी मिळाला तर, मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात १० लाख १५ हजार ८९० कोटी रूपये निधी मिळाला असल्याचं त्यांनी सातारा इथल्या सभेत सांगितलं.
भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष्य असून हे एनडीए सरकारच करु शकतं असं शाह यांनी सांगली जिल्ह्यात शिराळा इथल्या प्रचारसभेत सांगितलं. महाविकास आघाडीनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या जातील, असं सांगून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.