डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’ प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या दहा वर्षात भूमीबंदरांचा जो विकास झाला आहे, त्यामुळे  शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि  साहित्य यांच्यामधील आदानप्रदानात भर पडत आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये पेत्रापोल या भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’ या प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं, त्य़ावेळी ते बोलत होते. लँडपोर्ट थॉरिटीचे काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  समृद्धी, शांतता, भागाीदारी आणि विकास या चतुःसुत्रीवर चालत असल्याचं शाह यांनी सांगितलं. बांगलादेशातून दररोज पाच ते सहा हजार माणसे भारतात वैद्यकीय इलाजासाठी येतात. या भूमीबंदरावरच्या वाढत्या सुविधांमुळे व्यापार तसंच वाहतूक यांच्यात वाढ होईल, परिणामी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा