केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरात मधील अहमदाबाद इथल्या पिराना मधील ‘कचऱ्या पासून ऊर्जा’ निर्मितीच्या सर्वात मोठ्या केंद्राचं उद्घाटन होणार आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 375 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं हे केंद्र, सार्वजनिक-खाजगी-भागीदारीतून उभारण्यात येत आहे. एक हजार मेट्रिक टन घन कचऱ्यापासून 15 मेगा वाट ऊर्जा निर्मितीची या केंद्राची क्षमता आहे.