भारतीय बीज सहकारी संस्थेनं कमी पाणी आणि कमी कीटकनाशकांच कमी प्रमाण आवश्यक असलेल्या बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भारतीय बीज सहकारी संस्थेच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लहान शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं शहा म्हणाले.
भारतीय बीज सहकारी संस्थेनं भारतातल्या पारंपारिक बियांचं संकलन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने वेगाने काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. इफको आणि कृभकोने आपल्या देशी आणि संकरित बियाण्यांच्या पोषणमूल्यांचे मूल्यमापन केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.