डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाच्या सीमा संरक्षणाला मजबुती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

सीमा सुरक्षादल गेली ६ दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले.

जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि एमआय१७ देखील सहभागी झाली आहेत. यासोबतच श्वानपथकही या कार्यक्रमात सहभागी झालं असून या कार्यक्रमात ७ सैनिकांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा