हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
तर, जम्मू-काश्मीर मधील विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.