डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाकिस्तानबरोबरचा सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय – केंद्रीय गृहमंत्री

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधु जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे न्यायसंगत असून राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा आहे. पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानात पोहोचणार नाही याची खबरदारी यापुढे घेतली जाईल, असं शहा यांनी या बैठकीत सांगितलं. 

 

भारतात सध्या वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या होत्या. त्यानुसार काल नवी दिल्ली इथून १९१ पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा