केंद्र सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्याचे धोरण अवलंबले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जम्मू काश्मिरमधील दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये 70 टक्के घट झाली असून दहशतवादाच्या घटनांही कमी झाल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं. गृहमंत्रालयाच्या कामकाजाशी निगडीत चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या दहा वर्षांत सरकारने जम्मू-काश्मिर मध्ये दहशतवाद, नक्षलवाद आणि पुर्वोत्तर राज्यांमधील घुसखोरी या तीन मोठ्या आव्हानांचा सामना केला आहे.
केंद्र सरकारने कलम 370 दूर करुन संविधानकर्त्यांचे एक संविधान एक ध्वज हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे, असं सांगून पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत नक्षलवादाचा बिमोड करण्यात येईल असं आशा त्यांनी व्यक्त केली. गेल्या दहा वर्षात राजकीय इच्छाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा मजबूत केल्याचं गृहमंत्री म्हणाले.
गेल्या पाच वर्षात 14 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांचे 23 हजार किलोग्राम संमिश्र अमली पदार्थ नष्ट केल्याचं सांगून अमित शहा म्हणाले की, अमली पदार्थांचा धोक्याला तोंड देण्यासाठी आणि अफूच्या लागवडीला प्रतिबंध घालण्यासाठी ड्रोन, उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. राज्यसभेत काल गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.