केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. या नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातलं पोलिस दल, तुरुंग, न्यायालयं, खटले आणि न्यायवैद्यकशास्त्राशी निगडीत नव्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणी आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातल्या सर्व आयुक्तांलयांमध्ये शक्य तितक्या लवकर नवे फौजदारी कायदे लागू करण्याची सूचना केली. या बैठकीला राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर वरिष्ठ उपस्थित होते.न्यायव्यवस्था मजबूत होण्यासाठी गुन्हांची नोंद होणं गरजेचं असून प्राथमिक माहिती अहवाल दाखल कऱण्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा विलंब लागू नये असे निर्देश शहा यांनी दिले.