प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं ७२ व्या ईशान्य परिषदेला संबोधित करत होते. ईशान्येसाठी गेली दहा वर्षं खूप महत्त्वाची राहिली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य दिलं. इथं गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकार गुंतवणुकदारांना उद्युक्त करत आहे. ईशान्येत प्रस्थापित झालेली शांतता ही एक मोठी कामगिरी आहे, असं शहा यांनी सांगितलं.
ईशान्य भारताला देशातल्या अन्य भागांच्या बरोबरीनं आणणं प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचं उद्दिष्ट आहे, असंही शहा म्हणाले. ईशान्येत अतिरेकी कारवायांमध्ये ७१ टक्के घट झाल्याची माहिती ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी दिली.