केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली. या बैठकीत गंभीर सुरक्षा प्रश्नांवर, विशेषतः जम्मू कश्मिरमधल्या परिस्थितीवर भर देण्यात आला. जम्मू कश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय गृहसचिव गोंविद मोहन, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते, सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख दलजीत सिंग चौधरी आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
Site Admin | December 19, 2024 7:56 PM | Minister Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक
