डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 30, 2024 8:04 PM

printer

‘अमेरिगो वेस्पूची’ या नौकेचं मुंबईत आगमन हे भारत-इटली या देशांदरम्यानच्या मैत्रीचं प्रतीक’

इटलीच्या नौदलात ९३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘अमेरिगो वेस्पूची’ या प्रशिक्षण नौकेचं मुंबईत आगमन हे भारत आणि इटली या दोन देशांदरम्यानच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन,  केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या इंदिरा डॉक इथं ‘अमेरिगो वेस्पूची’ या नौकेची पाहणी सोनोवाल यांनी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अमेरिगो वेस्पूची ही नौका जग प्रदक्षिणेसाठी निघाली आहे. पुढच्या प्रवासासाठी या नौकेवरच्या चमूला सोनोवाल यांनी शुभेच्छा दिल्या. इटलीच्या नौदलाचे व्हाइस ॲडमिरल अँटोनिओ नाटाले आणि इतर यावेळी उपस्थित होते. या निमित्ताने इटलीची कला आणि संस्कृतीची झलक दाखवणारं एक प्रदर्शनही या नौकेजवळ भरवण्यात आलं आहे. २८ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झालेली ही नौका ३ डिसेंबरपर्यंत इथं राहील, त्यानंतर ती पुढच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा