डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंकडून तीव्र निषेध

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांच्या वक्तव्याचा भारतातल्या विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी तीव्र निषेध केला आहे. भारतात द्वेषपूर्ण भाषण आणि धर्मांतरविरोधी कायद्यातली वाढ चिंताजनक असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं होतं. अखिल भारतीय सूफी सज्‍जादानशीन परिषदेचे अध्‍यक्ष आणि अजमेर दर्ग्याच्या अध्यात्मिक गुरूंचे उत्तराधिकारी सैय्यद नसीरुद्दीन चिस्‍ती यांनी अमेरिकी अहवाल चुकीचा आणि बनावट असल्याचं म्हटलं आहे. अजमेरच्या चिश्ती फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी हा अहवाल फेटाळला आहे.

 

इतर देशांची मतं महत्त्वाची नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष निर्मल सिंग यांनी या अहवालावर टीका केली आहे. भारताचा सध्या सुवर्णकाळ असून प्रत्येक धर्माला संसदेत प्रतिनिधीत्व मिळालं असल्याचं ते म्हणाले. भारतीय सर्वधर्म संसदेचे राष्ट्रीय समन्वयक महर्षी भृगु पीठाधीश्‍वर गोस्‍वामी सुशील महाराज यांनी हा अहवाल म्हणजे देशाला दुर्बल करण्याचा एक प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा