अमेरिकेच्या धमक्यांना बळी पडणार नाही आणि व्यापार युद्ध संपवण्यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहू असं चीननं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेनं चीनकडून होणाऱ्या आयातीवर अतिरीक्त कर लादण्याचा निर्णय घेतल्यावर चीननंही कर वाढवला. हे दर आजपासून कमी केले नाही तर आणखी ५० टक्के अतिरीक्त कर लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. अमेरिकेनं हे कर लादले तर चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या मालावर १०४ टक्के दराने कर आकारणी होईल. दरम्यान, घसरत्या शेअर बाजारांना दिलासा देण्यासाठी चीनमधल्या सरकारी कंपन्यांनी शेअर खरेदी सुरू केली आहे. चीनमधल्या वित्तीय नियामकांनीही वीमा कंपन्यांना शेअर बाजारात अतिरीक्त निधी गुंतवण्याची मुभा दिली आहे.
Site Admin | April 8, 2025 8:57 PM | America | China
अमेरिकेच्या धमक्यांना बळी पडणार नाही, चीनचं स्पष्टीकरण
