केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने पाकिटबंद वस्तूंसाठीच्या २०११च्या मापन पद्धती नियमांमध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. या नियमांअंतर्गत पाकिटबंद उत्पादनांविषयी वापराच्या कालावधीची मर्यादा आणि इतर तपशील जाहीर करण्यापासून, किरकोळ विक्रीसाठी नसलेल्या २५ किलो, तसेच २५ लिटरपेक्षा जास्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद वस्तूंना वगळले होते. मात्र यापेक्षाही जास्त वजनाची पाकिटबंद उत्पादने किरकोळ बाजारातही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळल्याने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे सुधारित नियमांनुसार केवळ औद्योगिक ग्राहक किंवा संस्थात्मक ग्राहकांसाठी असलेल्या पाकिटबंद वस्तू – उत्पादने वगळता इतर सर्व पाकिटबंद वस्तू – उत्पादनांना तपशील जाहीर करणे बंधनकारक केले जाणार आहे. नागरिकांनी या सुधारणांबाबत येत्या २९ जुलै २०२४ पर्यंत, म्हणजे १५ दिवसांच्या आत आपापले अभिप्राय कळवावेत असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे.
Site Admin | July 14, 2024 7:30 PM | केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय | पाकिटबंद