डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशात महू इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार असून यावेळी त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन आणि भीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतील. भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून २५ एप्रिलपर्यंत राज्यव्यापी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जयंतीनिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांसह भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून गर्दी झाली आहे. जयंतीनिमित्त राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या मंत्र्यांनी देखील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा