डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

जीवनातल्या असंख्य अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आपल्या कर्तृत्वामुळे जगभरात आदराचं स्थान प्राप्त केलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

 

डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न साकार करू शकतोय. बाबासाहेबांची तत्वं, त्यांचे आदर्श, स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले.

 

कोट्यवधी दलित आणि इतर मागास समुदायांसाठी बाबासाहेब भारतातचं नव्हे तर जगभरात आशा, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून ओळखले जातात, अशा शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 

बाबासाहेबांनी चुकीच्या रुढी परंपरांमधून देशाला बाहेर काढून सर्वांना समान अधिकार त्यांनी मिळवून दिला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

 

महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचं, विचारांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा