अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी नुकतीच जॉर्जियाचे सिनेटर जॉन ओसॉफ यांची भेट घेतली. भारत- अमेरिका दरम्यान भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सिनेटनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल क्वात्रा यांनी समाज माध्यमांद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान, क्वात्रा यांनी न्यू हॅम्पशायर इथल्या सिनेटर जीन शाहीन यांचीही भेट घेतली असून दोन्ही देशातल्या संबंधांवर त्यांनी जी सकारात्मकता दाखवली त्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
Site Admin | November 21, 2024 2:39 PM
अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी घेतली जॉर्जियाचे सिनेटर जॉन ओसॉफ यांची भेट
