जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे. बालताल आणि पेहलगाम या दोन्ही मार्गांवर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.
२९ जूनला अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून ५२ दिवस सुरु राहणारी ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत सुमारे १.५ लाख भाविक या यात्रेत सहभागी झाल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.