डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतची कांस्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत यानं काल पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यानं प्युर्टो रिकोच्या डेरियन क्रूजला १३-५ असं हरवलं. पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे भारताचं सहावं आणि कुस्तीतलं पहिलं पदक आहे. २१ वर्षं आणि २४ दिवस वय असलेला अमन ऑलिम्पिक पदक पटकावणारा सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या यशाबद्दल अमन सेहरावत याचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताची पैलवान रीतिका हूडा ७६ किलो वजनी गटात मैदानात उतरणार आहे. गोल्फमध्ये कालच्या तिसऱ्या फेरीत अदिती अशोक आणि दीक्षा डागर या दोघींचीही कामगिरी निराशाजनक होती. त्यांची पुढची फेरी आज होणार आहे.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या भारताचा पुरुष हॉकी संघाचा क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी आज सत्कार केला. या संघानं जागतिक पातळीवर केलेल्या कामगिरीमुळे संपूर्ण देशाची मान उंचावली गेली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा