चित्रलेखा साप्ताहिकाने आपल्या पत्रकारितेतून देशातल्या समस्यांवर प्रकाश टाकला असून देशाच्या विकासात महत्वाची भूमिका निभावली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चित्रलेखानं समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं असंही शहा म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रलेखाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आणि चित्रलेखा मराठी साप्ताहिक पुन्हा सुरू करावं अशी विनंती केली.