डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. संपूर्ण विश्वाचं उदरभरण करण्याची क्षमता भारतीय कृषिक्षेत्रात आहे, असं ते म्हणाले. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मातीचा पोत सुधारण्याकडे लक्ष द्यावं लागेल. चांगलं बी-बियाणं, वाण शोधावे लागतील, पाण्याचा काटकसरीनं वापर, तसंच जलपुनर्भरणाच्या क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा