अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रशासकीय फेरबदलांतर्गत ५८२ न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात २३६ अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, वरिष्ठ विभागातले २०७ दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ विभागातले १३९ दिवाणी न्यायाधीश यांचा समावेश आहे. कानपूर भागात सर्वाधिक बदल्या झाल्या असून १३ न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिगढ इथल्या ११ आणि बरेलीच्या पाच न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे सहनिबंधक सतीश कुमार पुष्कर यांनी काल संध्याकाळी हे आदेश दिले असून बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांना ताबडतोब नवीन पदांवर रुजू व्हायचे निर्देशही दिले आहेत.
Site Admin | March 31, 2025 2:53 PM | Allahabad High Court
अलाहाबाद उच्च न्यायालयात ५८२ न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्या
