उत्तर प्रदेशात संभल जिल्ह्यामध्ये असलेल्या जामा मशिदीच्या रंगसफेदीचं काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश आज अलाहाबाद उच्च न्यायालयानं भारतीय पुरातत्व विभागाला दिले. या प्रकरणी मशिद समितीच्या वकिलांनी मशीद रंगवणं आणि दिवे बसवण्यासाठी पुरातत्व विभाग नकार देत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर उच्च न्यायालयानं रंगसफेदी करण्याचे तसंच, मशिदीच्या बाहेरच्या भागात दिवे बसवण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला दिले आहेत.
Site Admin | March 12, 2025 1:20 PM | Allahabad High Court
जामा मशिदीच्या रंगसफेदीचं काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निर्देश
