डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्वच उपसा सिंचन योजना आता सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार असल्यामुळे या सिंचन योजनांचा संपूर्ण फायदा मिळू शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलपुरात एका कार्यक्रमात व्यक्त केला. राज्यातल्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक जिल्ह्यात उपसा सिंचन योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांच्या मोठ्या वीज बिलांमुळे त्या योजना चालविणे कठीण होते. मात्र आता या योजना सौर उर्जेवर काम करतील; त्यासाठी त्यासाठी केंद्र शासनानं राज्य शासनाला जवळपास 29 हजार कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. सौरउर्जेमुळे वीज पोहचली नसेलल्या गावांनाही याचा लाभ होईल. यामधून पहिल्या टप्यात 12 हजार तर दुसऱ्या टप्यात 3 हजार कोटी रुपयांची कामं सुरू असल्याची फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा