दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. अॅलिस वाझ यांनी काल सांगितलं. निवडणूक आयोग आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, मतमोजणीसाठी दिल्लीतील 11 जिल्ह्यांमध्ये 19 मतमोजणी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सांख्यिकी कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांसह सुमारे पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
Site Admin | February 7, 2025 10:01 AM | दिल्ली | विधानसभा निवडणुक
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण
