देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली इथं संसद भवनातल्या संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.