आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी २००६ मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नागपूर मध्ये लोकमत मधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं.
आकाशवाणी मुंबई केंद्रात नभोनाट्य, वनिता मंडळ, साप्ताहिक स्वास्थ्य सेवा, आरोग्यम धनसंपदा, अशा विविध सदरांमधून त्यांनी सकस आणि दर्जेदार कार्यक्रम सादर केले आणि ते श्रोत्यांच्या पसंतीला उतरले. प्रसन्न आवाज आणि संवादातली आपुलकी, हे त्यांच्या सादरीकरणाचं वैशिष्ट्य होतं.