इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात आज भारताच्या एच एस प्रणॉय ला फ्रान्सच्या टॉमा जुनियर पोपोव ने १९-२१ , १६ -२१ असं पराभूत केलं. भारताच्या लक्ष्य सेन चा सामना आज सायंकाळी तैवानच्या सु ली यांग शी होणार आहे.
महिला एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या मालविका बनसोडचा सामना आज सिंगापूरच्या ईओ जिया मिन शी होणार आहे.
महिला दुहेरी गटात अश्विनी पोन्नप्पा आणि तनिषा क्रॅस्टो यांचा संघ आणि मिश्र दुहेरी गटात आद्या वारियात आणि सतीश कुमार यांच्या संघाचे सामनेही आज होणार आहेत .
ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू , तसंच जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे सामने उद्या होणार आहेत.
याशिवाय महिला दुहेरी गटात ट्रीसा जॉली, गायत्री गोपीचंद,प्रिया कोंजेनबाम, श्रुती मिश्रा, तसंच मिश्र दुहेरी गटात रोहन कपूर, ऋत्विका गड्डे , ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो खेळणार आहेत.