इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला चीनच्या ली शिफेंग कडून १०-२१, १६-२१ अशा सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.
तर महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला चीनच्या टॅन निंग आणि लिऊ शेंगशु या जोडीनं पराभूत केलं.