मध्य पूर्व आशियातली तणावपूर्ण स्थिती लक्षात घेत एअर इंडियानं इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी आणि तिथून देशात येणारी सर्व विमान उड्डाणं ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून ही उड्डाणं रद्द केल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. उड्डाणं रहित झाल्यानं ज्या प्रवाश्यांची तिकिटं रद्द झाली आहेत त्यांना तिकिटाचे पैसे परत घेण्याचा किंवा प्रवासाची तारीख पुढे ढकलण्याचा पर्याय देण्यात आल्याचं एअर इंडियानं जाहीर केलं आहे.
Site Admin | August 3, 2024 9:50 AM | AIR India
एअर इंडियाची इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द
